घारगाव पोलिसांचे दारू अड्ड्यावर छापे, देशी दारूचा साठा जप्त

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील पठारभागातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर घारगाव पोलिसांनी आज धडक कारवाया करत तीन वेगवेगळ्या ठिकाणावर छापे टाकत सुमारे सतराशे रुपये किमतीची देशी दारू जप्त केली असल्याची माहीती घारगाव पोलिसांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर काल सकाळी टाकलेल्या वेगवेगळ्या छाप्यात खंदरमाळवाडी येथे आरोपी रमेश नामदेव गोंधे, आंबीखालसा येथे आरोपी पतीराम भगवती यादव, बोटा येथे आरोपी नवनाथ केरू कुरकुट हे सर्व देशी संत्रा दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याचे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आले.

याबाबत घारगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध मुंबई प्रोव्हिजन कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)