संगमनेर तालुक्‍यात 150 मंडळांकडून गणरायाची स्थापना 

संगमनेर – ढोल-ताशांचा गजर… मोरया.. मोरयाचा जयघोष करत संगमनेरात सर्वांच्या लाडक्‍या बाप्पांचे आगमन झाले. शहरात 60 तर तालुक्‍यात 90 गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेत गणरायाची विधिवत स्थापना केली. सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी व दुकानांची रेलचेल दिसत होती. गणेशमूर्तींच्या दुकानांसह सजावटीच्या वस्तूंची दुकानेही यावर्षी मोठ्या प्रमाणात बघावयास मिळाली.

पर्यावरणाचे महत्व आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन दरवर्षीपेक्षा यावर्षी शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे अनेक कलाकुसर ग्राहकांना उपलब्ध होते. गणेश मूर्ती व सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील कुंभारआळी, बाजारपेठ, नवीन नगर रास्ता, शिवाजी नगर या भागात ग्राहकांनी मोठी गर्दी केली. तालुक्‍यातील गावांतूनही गणेश मंडळे गणेश मूर्ती घेण्यासाठी शहरात आली होती.

मंडळांच्या सदस्यांकडे ट्रॅक्‍टर, ढोल, बॅंड, स्पीकर इत्यादी साहित्य गणेशाच्या आगमनासाठी सज्ज होते. संगमनेर शहर व उपनगरात 60, तालुका पोलीस हद्दीत 37, घारगाव 24, आश्वी 29 अशा ऐकून 150 गणेश मंडळानी प्रशासनाची परवानगी घेतली. शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी गर्दीच्या व वाहतूक कोंडीच्या दृष्टिकोनातून संध्याकाळी गणपती आणायचे पसंत केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस प्रशासनाने मोठ्या आवाजातील ध्वनी यंत्रणेऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यानुसार श्री गणेशाच्या आगमनादिवशी पारंपरिक वाद्यांचाच गजर झाला. घरगुती गणेशासोबतच अनेक मंडळांनी बॅंड-बेंजो पथक, ढोल-ताशा अशा वाद्यांच्याच निनादात गणेशमूर्तींची मिरवणूक काढली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)