‘संगमनेर फेस्टिव्हल’मध्ये दर्जेदार कार्यक्रम

मनीष मालपाणी यांची माहिती; ‘अनन्या’ नाटक पाहण्याची संधी

संगमनेर – संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरलेला संगमनेर फेस्टिव्हल यंदा दशकपूर्ती साजरी करीत आहे. संगमनेरकरांच्या मनात स्थान मिळविणाऱ्या या लोकोत्सवात या वर्षीही विविध दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संगीत रसिकांना मोहिनी घालणाऱ्या वैशाली माडे यांचा ऑर्केस्ट्रा आणि आपल्या शारीरिक उणिवांवर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या “अनन्या’च्या जीवनावर आधारित नाटक या वर्षीच्या संगमनेर फेस्टिव्हलचे मुख्य आकर्षण असल्याची माहिती फेस्टिव्हलचे जनक मनीष मालपाणी यांनी दिली.

गणरायांच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार (दि.14) सायंकाळी सहा वाजता संगमनेर फेस्टिव्हलचा प्रारंभ होणार आहे. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व महाराष्ट्रातील गाजलेले वक्ते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या पहाडी आवाजातून “आगऱ्याहून सुटका’ हे शिवपराक्रमावर आधारित व्याख्यान ऐकण्याची संधी संगमनेरकरांना मिळणार आहे. शनिवार 15 व रविवार 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता छोट्या व मोठ्या गटांची राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा “जल्लोश समूहनृत्याचा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी सुमारे दीड लाख रुपयांची भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत राज्यातील विविध ठिकाणचे समूहनृत्य संघ सहभागी झाले आहेत.

सोमवारी (दि. 17) सायंकाळी सात वाजता आपल्या शारीरिक उणिवांवर मात करीत जगण्यासाठी संघर्ष करणारी अनन्या देशमुख संगमनेरकरांना भेटणार आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या या भावनाप्रधान नाटकात ऋतुजा बागवे, प्रमोद पवार, विशाल मोरे, अनघा भगरे, अजिंक्‍य ननावरे व सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सात वाजता सारेगमप विजेती गायिका वैशाली भैसने-माडे व मराठी चित्रपट संगीतामध्ये नावाजलेला पार्श्‍वगायक चैतन्य कुलकर्णी आपल्या मधूर आवाजातून संगमनेरकरांना मंत्रमुग्ध करणार आहे.

बुधवारी (दि. 19) सायंकाळी सात वाजता एकट्या पडलेल्या आजोबांना अचानकपणे लाभलेले नातीचे नाते आणि त्यातून उलगडत गेलेले जीवनाचे अंतरंग यांचा सार असलेले “डियर आजो’ हे लोकप्रियतेच्या शिखरावरील कौटुंबिक रंगतदार नाटक होणार आहे. गुरुवारी (दि. 20) सायंकाळी सात वाजता वारकरी संप्रदायातील तरुण कीर्तनकार, वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षापासून कीर्तनसेवा करणाऱ्या ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासर्व कार्यक्रमांना संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष कैलास आसावा, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव वेणुगोपाल लाहोटी, खजिनदार गौरव कलंत्री व मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)