संगमनेर : साकुर परिसरातील 400 मेंढपाळांचे स्थलांतर

 संगमनेर : पुणे जिल्ह्याच्या दिशेने चारापाण्याच्या शोधार्थ गाव सोडून निघालेले मेंढपाळ. (छाया : नितिन शेळके)

चारा पाण्याअभावी 30 हजार मेंढ्यांचा प्रश्न गंभीर;100 मेंढपाळ कुटुंबीय स्थलांतराच्या मार्गावर

संगमनेर : यंदा ऑक्‍टोंबरमध्येच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने संगमनेर तालुक्‍यात साकुर परिसरातील 400 मेंढपाळ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जवळपास 100 मेंढपाळ कुटुंबीय स्थलांतराच्या मार्गावर आहेत. परिसरात यंदा चारा-पाण्याची सोय आणि रोजगार उपलब्ध नसल्याने मेंढपाळांनी कुटुंबासह गाव सोडल्याचे सांगितले जात आहे.

पठार भागातील साकुरसह हिवरगाव पठार, शेंडेवाडी, धुमाळवाडी, गिरेवाडी, दरेवाडी, जांबुत बु, जांबुत खु, पांदरा, मांडवे बु, शिंदोडी कौठे मलकापूर, बीरेवडी, दरेवाडी, शेळकेवाडी, कुंभारवाडी, जांभळवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज मेंढ्या पाळतात. त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मेंढ्यापालन आहे.

औंदा भरपेट पाऊस पडलाच नाय. रानावनात झाडपाला व गवत उगवले नाय. काळेकुट्ट रान व त्यातच पाणीबी नाय. म्हणून मुक्‍या जित्राबांसाठी आम्ही पोराबाळांसह गाव सोडलया.
– बंडू ठोंबरे, मेंढपाळ जांभळवाड.

पावसाळ्यात येथील डोंगरदऱ्या व गायरानात उगवलेले गवत व झाडपाला, वनस्पतीवर मेंढ्यांची उपजीविका होते. मात्र यंदा येथील डोंगर व गायरान जमिनी हिवाळ्यातच बोडकी झाली आहे. त्यामुळे या परिसरातील 30 हजार मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

त्यामुळे मेंढपाळ मेंढ्या व कुटुंबीयांसह चारा पाण्याच्या शोधात पुणे जिल्ह्यात व कोकणात आदी ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. स्थलांतरामुळे मेंढपाळांची मुले शिक्षणापासून वंचित झाली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)