जयहिंद महिला मंचाकडून सैनिकांना फराळ

File Photo

संगमनेर – आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना जयहिंद महिला मंच व राजमाता जिजाऊ महिला मंडळच्या वतीने दिवाळीचे फराळ देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष तथा नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी दिली आहे.

भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही त्यांना घरी येता येत नाही. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस डोक्‍यावर घेऊन सैनिक आपले कर्तव्य पार पाडत असतात.त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करण्यासाठी तालुक्‍यातील सर्व बचतगट, महिला मंडळांतर्फे ज्येष्ठ सैनिक रावसाहेब कोटकर व मेजर प्रकाश कोटकर यांच्या संकल्पनेतून सैनिकांना लाडू, शंकरपाळे, शेव, चिवडा व विविध पदार्थ बनवून पाठविण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अभिनव उपक्रमात तालुक्‍यातील अनेक कुटुंबही सहभागी होणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कायम सैनिकांचा सन्मान व आदर केला असून, त्यांना फराळ पाठविण्याच्या संकल्पाचे कौतुक केले आहे.
तालुक्‍यातील महिला मंडळे, बचतगट, नागरिकांनी फराळाचे पदार्थ बनवून 1 नोव्हेंबरपर्यंत यशोधन या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात पोहोच करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष तांबे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)