संगमनेरात 13 जुगाऱ्यांवर गुन्हा; 37 हजाराची रोकड जप्त

संगमनेर – शहरातील तीनबत्ती चौकातील जाहागिरदार वाडा व तेलीखुंट येथे सुरू असलेल्या अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापे टाकले. या वेळी 37 हजार रुपयांची रोकड व 10 मोबाईल जप्त करण्यात आले.

13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जहागिरदारवाडा व तेलीखुंट येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांना खबऱ्यांकडून मिळाली.

-Ads-

त्यांच्या पथकाने दोनही ठिकाणी छापा टाकत 37 हजार रुपयांची रोकड व 10 मोबाईल जप्त केले. पो. कॉ. बापूसाहेब हांडे व नीलेश कोळपकर यांच्या फिर्यादीवरून 13 जणांविरुद्ध मुंबई जुगार कायदा 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)