तमाशाला अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू

आढळराव पाटील यांचे आश्‍वासन; कांताबाई सातारकरांचा नागरी सत्कार

संगमनेर – तमाशा हा ग्रामीण भागातील गावाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. केंद्र व राज्य शासनाकडून तमाशा कलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेत या संदर्भात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला आहे. तमाशा फडाला अनुदान देण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात आढळराव बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. बाळासाहेब थोरात होते. या वेळी खा. विजयसिंह मोहिते पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, आ. डॉ सुधीर तांबे, शिरूरचे आ. बाबूराव पाचर्णे, माजी आ. बापूसाहेब पठारे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. संजय मालपाणी, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, भाऊसाहेब कुटे, माधवराव कानवडे उपस्थित होते.

खा. आढळराव पाटील म्हणाले, की तमाशा ही कला जगविण्याचे काम कलावंतानी केले आहे. दिवसेंदिवस तमाशा कलावंतांचे प्रश्न कठीण होत आहेत. ते सोडविण्याचे प्रयत्न शासन सुरू आहेत. ग्रामीण भागात तमाशा ही गरज असून कलावंताना मानसन्मान दिला जात आहे. तमाशा फड सुरू राहावे, यासाठी आपण लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहे. राज्य शासनाकडून कलावंतांचे प्रश्न सोडविले जात आहेत. तमाशा कलेला जागृत ठेवण्याचे काम आजही कांताबाई सातारकरसारखे ज्येष्ठ कलावंत करत आहे.

सत्काराला उत्तर देताना कांताबाईंना गहिवरून आले. तमाशा कलावंतावर अशाच प्रकारे यापुढेही प्रेम व्यक्त करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचे चिरंजीव रघुवीर खेडकर यांनीही आईबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी गुजराथी, ढोबळे, पठारे, आ. तांबे, पाचर्णे, मंगलदास बांदल, डॉ. संजय मालपाणी, दुर्गाताई तांबे आदींची भाषणे झाली. या सत्कार समारंभाला माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, लक्ष्मण कुटे, मंगलाताई बनसोडे, संतोष खेडलेकर, मुंबई विद्यापीठाचे भास्कर चंदनशिवे, शरद लेंडे, हेमंत अलाणे, शिवदास शेटे आदीसह उपस्थित होते. स्मिता गुणे यांनी सूत्रसंचालन केले. शिवदास शेटे यांनी आभार मानले.

कांताबाईची ग्रंथतुला

आपले संपूर्ण जीवन तमाशा कलेला समर्पित करणाऱ्या कांताबाईंच्या सत्कार सोहळ्यात मानव फौंडेशन पुणे व लक्ष्मण प्रकाशन संस्थेच्या वतीने ग्रंथतुला करण्यात आली आहे. ही पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)