दरोडेखोरांकडून 80 हजारांचे दागिने हस्तगत

नगर – सांडवा शिवारातील चेअरमनवस्तीवर (ता. नगर) येथे 12 ते 13 दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. या दरोडेखोरांपैकी स्थानिक गुन्हे शाखा आणि नगर तालुका पोलिसांनी काही तासातच तिघांना अटक केली. फिलीप नादर चव्हाण (वय 22), रोहित नादर चव्हाण (वय 19, दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) व शेषराव देश्‍या चव्हाण (वय 21, रा. शेरी, ता. आष्टी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दत्तात्रय खांदवे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या दरोडेखोरांनी धुमाकूळ घालताना कुऱ्हाड, लोखंडी गज, चाकुचा धाक दाखवित वस्तीवरील काहींना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरोडेखोरांच्या धारिष्ठ्याची माहिती मिळताच, स्थानिक गुन्हे शाखा आणि नगर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत दरोडेखोरांना जेरबंद करण्याची मोहिम आखली. त्यात वरील तिघांना अटक करण्यात यश आल्याचे नगर तालुका पोलिसांनी सांगितले. दरोडेखोरांनी चोरलेले 80 हजार रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)