भटके विमुक्त हक्क परिषदेचे धरणे आंदोलन

सोनई – भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे शुक्रवार दि. 28 रोजी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष मोहन शेगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

शेगर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भटके विमुक्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आज हा समाज तंबूत राहून भिक्षूकी करून जीवन जगत आहे. मुळात या समाजास अतिशय तोडक्‍या शासकीय योजना असून त्या जाहीर होतात, परंतु त्या तळागाळापर्यंत पोहचत नाही. निधीची कमतरता व जाचक अटींमुळे या योजनेचा लाभ मिळत नाही. पारंपरिक व्यवसाय बुडाल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपजीविकेसाठी आजही हा समाज रानोमाळ भटकत आहे. भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी दि. 28 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत एकदिवसिय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)