संभाजी भिडे गुरुजींना स्थानबद्ध करण्याची मागणी

कोपरगाव – मागील वर्षी जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव दंगलीनंतर महाराष्ट्र होरपळून निघाला. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडू नयेत, याची काळजी सरकारने घ्यावी. तसेच 1 जानेवारी रोजी विजयी दिवस साजरा होईपर्यंत संभाजी भिडे गुरुजी यांना स्थानबद्ध करण्यात यावे, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पोळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पोळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, भीमा कोरेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजयी दिवस साजरा केला जात होता. मात्र मागील वर्षी या ठिकाणी संभाजी भिडे यांनी तरुणांमध्ये द्वेष भावना निर्माण केली. त्यातून मागील वर्षी मोठी दंगल घडली. या दंगलीने राज्य धुमसत राहिले. या घटनेची मुख्य साक्षीदार पूजा सकट हिचा नाहक बळी गेला. तिच्या कुटुंबाची वाताहत झाली. तसेच शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

यावर्षी 1 जानेवारी रोजी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत. मात्र पुन्हा मागील वर्षी सारखा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सरकारने दक्षता घेणे आवश्‍यक आहे. मागील वर्षीच्या दंगलीचा मुख्य सूत्रधार असलेले संभाजी भिडे गुरुजी राजकीय वरदहस्त असल्याने अजूनही मोकळेच आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या दंगलीचे भांडवल करून आपले बस्तान बसवले आहे व आपली राजकीय वाटचाल सुकर करून घेतली आहे.

मोठ्या उत्साहात अनुचित घडू नये, म्हणून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक तरुणांना तुरुंगात ठेवले.त्याच पार्श्‍वभूमीवर पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून एक महिना संभाजी भिडे यांना पोलिसांनी स्थानबद्ध करावे, निवेदनात केली आहे. निवेदनावर लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के, सुजल चंदनशिव, विनोद वाकळे, गोपीनाथ ताते, घटनाकार मैत्री संघाचे गौतम बनसोडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नितीन शिंदे आदींच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)