तोफखाना व एमआयडीसी हद्दीत चोरी सत्र : रोख रकमेसह कपड्यांची पिशवी चोरीला

नगर – शहरातील वेगवेगळ्या चार चोरींच्या गुन्ह्यात चोरांनी तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. तोफखाना आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या चोऱ्या झाल्या आहेत. डिकीतून रोख रक्कम, मोबाईल, कपडे आणि दुचाकीचा समावेश आहे.

सावेडी नाका परिसरातून दुचाकीच्या डिकीतून चोरांनी 2 लाख 90 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. हर्षल कदम (वय 22, रा. हनुमाननगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. चोरांनी चोरीत कपडे देखील सोडले नाही. यश शहा (रा. गुरूगणेश, वसंत टॉकीज) यांच्या दुचाकीच्या मागील बाजूस खरेदी केलेले नवे कपड्यांची पिशवी लावली होती. चोरांनी झोपडी कॅंटीन परिसरात त्यांच्या दुचाकीवरून ही पिशवी चोरून नेली. सुमारे 5 हजार 64 रुपयांचे हे कपडे होते.

विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमातून चोरांनी दहा हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. चांद शाहमिया सय्यद (वय 50, नोकरी) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विघ्नहर्ता रेसिडेन्सीमधून चोरांनी 25 हजार रुपयांची दुचाकी चोरून नेली. नितीन वावरे (रा. साईराज नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)