दुचाकीवरून नगरला येणारी दरोड्यातील टोळी गजाआड

नगर – दुचाकीवरून नगरला येणाऱ्या आणि दरोड्याच्या तयारी असलेल्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगर-दौंड रोडवरील बाबुर्डी (ता. नगर) येथे ही कारवाई केली. नगर तालुका पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आर्म ऍक्‍टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टोळीतील एकाविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

पांगळा टेंचर काळे ऊर्फ अरविंद (वय 27), चक्कर खवड्या भोसले ऊर्फ विशाल (वय 30, रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदे), किसन सुरेश पवार ऊर्फ अनिल (वय 18, रा. पांगरी, ता. करमाळा, जि. सोलापूर), दत्तू रामा काळे ऊर्फ रोहिदास (वय 22, रा. परतूर, जि. परभणी), विष्णू सुभाष पिंपळे (वय 21, रुशिया, जि. विधीशा, मध्यप्रदेश), बोलक्‍या प्यारेलाल मोधिया (वय 30, रा. गुलगाव, मध्यप्रदेश) या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या टोळीकडच्या 60 हजार रुपयांच्या दोन दुचाकी, एक कत्ती, कटावणी, तलवार, मिरची पूड, दोन लाकडी लांडके व एक काळे रंगाचे पिस्टलसारखे लायटर पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस अधीक्षर रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)