नगर महापालिका रणसंग्राम : दानवेंच्या त्या ‘300’ कोटींची चौकशी पूर्ण

राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याची उत्सुकता


राज्य निवडणूक आयुक्तांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सुपूर्द

प्रलोभन दाखविणे हा क्राईमच!

मतदारांना प्रलोभन दाखविणे हा क्राईमच आहे. निवडणुकीत यासंदर्भात कोणतेही तक्रार आल्यास त्याची बारकाईने चौकशी होईल. निवडणुकीची प्रक्रिया दिवसेंदिवस क्‍लिष्ट होत चालली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईनपद्धतीने सोपी करण्यात आली आहे. त्याचा वापर उमेदवार आणि मतदारांनी करावा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्वर सहारिया यांनी केले.

-Ads-

नगर – भारतीय जनता पक्षाच्या महापौर द्या, शहर विकासांसाठी 300 कोटी देऊ, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना म्हटले होते. या वक्‍तव्याची चौकशी पूर्ण झाली असून, त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे सुपूर्द केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आयुक्त राजेश्वर सहारिया यावेळी उपस्थित होते.

ही प्रशासकीय गोपनीय माहिती असून, राज्य निवडणूक आयोगच त्यावर निर्णय घेईल, असे द्विवेदी यांनी सांगून निर्णयाचा चेंडू सहारिया यांच्या कोर्टात टोलवला.

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नगरमध्ये वाढविण्यात आला होता. दानवे यांनी पक्षाचा महापौर द्या, शहर विकासांसाठी 300 कोटी देऊ, असे जाहीर आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासन म्हणजे मतदारांना प्रलोभन आहे.

केतन गुंदेचा यांनी यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त राजेश्वर सहारिया हे नगर दौऱ्यावर आहेत. प्रशासकीय कामाचा त्यांनी आढावा घेतला. त्यापार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी दानवे यांच्याविरोधात झालेल्या तक्रारीची चौकशीची माहिती विचारण्यात आली होती.

जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, “खासदार रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याविषयी तक्रार आली होती. त्या तक्रारीची शहानिशा आणि चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रशासकीय गोपनीय अहवाल असल्याने त्यातील माहिती सांगता येणार नाही. परंतु राज्य निवडणूक आयोग त्यावर निर्णय घेईल.’ सहारिया देखील या पत्रकार परिषदेत होते.

ते म्हणाले, ‘दानवे यांच्या वक्तव्याच्या चौकशीचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडे ही तक्रार आली आहे, याची माहिती आहे. ते चौकशी करून त्यावर अहवाल पाठविल्यास त्यावर कारवाई करू.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)