चिखली ते कळस रस्ता दुरुस्तीसाठी “रास्ता- रोको’

संगमनेर : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर चिखली ते कळस या दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी सकाळी दहा वाजता “रास्ता-रोको’ आंदोलन करण्यात आले.

संगमनेर व अकोले तालुक्‍यांना जोडणाऱ्या कोल्हार घोटी या राज्यमार्गावरील चिखली ते कळस या दहा किलोमीटर अंतरावरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र दुरूस्ती झाली नाही, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी “रास्ता-रोको’ करण्याचा इशारा कातोरे यांनी दिला होता.

धांदरफळ परिसरातील सातवा मैल येथे आज सकाळी सुमारे दीड तास “रास्ता-रोको’ करण्यात आला. या आंदोलन करताच तहसीलदार साहेबराव सोनवणे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग उपकार्यकारी अभियंता प्रवीण भोसले हे घटनास्थळी हजर झाले.

यावेळी आंदोलनकर्ते उपअभियंता यांच्यात बाचाबाची झाली. यात तहसीलदार सोनवणे यांनी मध्यस्ती करत आंदोलनकर्त्यांना शांत केले. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याशी चर्चा करून हा रस्ता लवकरच दुरुस्त केला जाईल असे आश्‍वासन तहसीलदारांनी दिले. बऱ्याच वेळ आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी विरुद्ध घोषणा दिल्या. तब्बल दीड तासाने हे आंदोलन मागे घेण्यात आले. या “रास्ता-रोको’ मुळे रस्ताच्या दोन्ही बाजुस वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात पंचायत समिती सभापती निशा कोकणे, बाळासाहेब देशमाने, बाळासाहेब मोरे, सुरेश थोरात, अनिल काळे, बाळासाहेब लांडगे, रमेश नेहे, दत्ता कासार, भानुदास शेटे, जावेद तांबोळी, देविदास देशमाने, संगम आहेर, अरुण हासे, शैलेश देशमुख, संतोष हासे, शिवाजी कर्पे आदींसह परिसरातील शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)