उत्कर्ष बालघरचे नविनपिढी सक्षम घडविण्याचे कार्य

नगर – मुले ही फुलांसारखी निरागस असतात. समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करुन ही संस्था आदर्श समाज घडविण्याचे कार्य करत आहे. मुलांनी चांगले शिक्षण घेऊन सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात नाव कमवावे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या संस्थेला मदतीचा हातभार लावावा, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख अरुणताई गोयल यांनी केले.

नेप्ती येथील उत्कर्ष बालघर येथे शिवसेना महिला आघाडीच्यावतीने रक्षाबंधन करण्यात आले. याप्रसंगी अरुणाताई बोलत होत्या. या कार्यक्रमास शिवसेना उपशहरप्रमुख उषाताई ओझा, कराटे प्रशिक्षक निताताई शिंदे, ऋषीकेश अष्टेकर, बालघरचे युवराज गुंड, संभाजी चव्हाण आदि उपस्थित होते. सर्व मुलांना औक्षण करुन राखी बांधण्यात आली. तसेच येथील बालकांसमवेत गप्पागोष्टी करण्यात आल्या.

सर्व मुलांना हा कार्यक्रम पाहून आनंद झाला. मुलींसमवेत गोयलताई फुगडीचा खेळ खेळल्या. व यापुढेही बालघरला भेट देऊन सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी उषाताई ओझा म्हणाल्या की, मुलांनी चांगले शिक्षण घेऊन इंजिनिअर, डॉक्‍टर, खेळाडू तसेच उच्चशिक्षित व्हावे. कराटे प्रशिक्षक निताताई शिंदे म्हणाल्या , बाल घरातील मुलांना मोफत कराटे प्रशिक्षण देवून स्वसंरक्षणा साठी सक्षम करणार असल्याचे सांगितले.

प्रास्तविकात युवराज गुंड म्हणाले की, समाजातील दीनदुबळ्या घटकांसाठी ही संस्था कार्य करत आहे. या संस्थेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)