नरबळी नावाखाली फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय राजस्थानमधील टोळी गजाआड

नगर – अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळी अथवा एक लाख रुपये द्यावेत लागतील असे सांगून फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय राजस्थानमधील परिसाहब टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांनी गजाआड केली आहे.या टोळीचे दोनजण ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चमत्कार करण्यासाठी वापऱ्यात आलेले साहित्यांसह 9 हजार रुपये जप्त केले आहेत.

सासु सासरे चांगले वागत नाहीत, मुलबाळ होत नाही, अंगता येणे यासाठी अंधश्रद्धेतून चमत्कार करून अनेकांची फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीमधील सुरूची डेअरी एक्‍स 1 ब्लॉक या दुकानात छापा टाकून पिरसाहब उर्फ अब्दुल गफ्फार खलीफा (वय 36) व सद्दाम सलीम तवर (वय 20 दोघे रा.फत्तेवार, शेखावटी जिल्हा सिक्‍कर राज्य राजस्थान) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून चमत्काराचे अगरबत्ती, विविध पावडरी, जब्लनाचे साहित्य व 9 हजार रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने श्रीरामपूर, राहूरी, राहाता, लोणी, कोल्हार येथील अनेकांना गंडा घातला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)