नगर जिल्ह्यात पावसाची हजेरी

संग्रहित छायाचित्र

दिड महिन्याच्या दडीनंतर : ऐन दिवाळीत बरसल्या सरी

नगर – जवळपास दिड महिने दडीमारल्यानंतर आज सायंकाळी6 च्या सुमारास नगरमध्ये वरूण राजाने हजेरी लावली.या पावसाने दिर्घ प्रतिक्षेनंतर फुललेला दिवाळीचा बाजार काहि काळ विस्कळीत झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मुलांच्या शाळांना लागलेली सुटी पालकांचा झालेला पगार आणि त्यात उद्या रविवार या हिशोबाने खरेदी साठी बाहेरपडलेल्या ग्राहकांच्या उत्साहावर काहिसं पाणी फिरले,मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर वरूण राजाने हजेरी लावल्याने त्याचे स्वागत करावे कि खरेदी करावी अशी द्विधा मनस्थिती अनेकांची झाल्याचे दिसत होते.

नगर शहर , सावेडी व अन्य उपनगरांसह तालुक्‍यातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याची नोंद आहे.तर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातील बोटा परिसरातही काही गावांमध्ये मध्यम ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या शिवाय शेवगाव तालुक्‍यात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी दाटली मात्र ऐन वेळी पावसाने हुलकावणी दिल्याचे सायंकाळी चित्र होते .मात्र तेथेही रात्री उशिरा बुरबुर सुरू झाल्याचे वृत्त आहे. तर कर्जत तालुक्‍यातील कुलधरण येथे काहि मिनीटे पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे.नगर शहर व उपनगरात 15 ते 20 मिनीटे पावसाने झोडपले.

एकुणच पावसाच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर आता पावसाने हजेरी लावल्याने शेतात उभ्या पिकांना काहिसा दिलासा मिळाला असला तरी या अगोदरच्या काही दिवस पावसाने सलग हजेरी लावली असती तर दिवाळी उत्सवात चांगला उत्साह निर्माण झाला असता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)