बोधेगावातून धावणार बेलापूर-परळी रेल्वे

काम प्रगतीपथावर असल्याचे ग्रामपंचायतीला पत्र

बोधेगाव – बोधेगावातून जाणाऱ्या बेलापूर- परळी या भारतीय रेल्वे मार्गाच्या कामासंदर्भात बोधेगाव ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्यानंतर भारत सरकारच्या उपमुख्य अभियंत्यांनी हे काम प्रगतीपथावर असल्याचे पत्र नुकतेच बोधेगाव ग्रामपंचायतीला दिल्याने बोधेगावसह परिसरातील नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीरामपुर – नेवासा – शेवगाव बोधेगावमार्गे गेवराई, बीड आणि परळी अशा रेल्वे मार्गाचे काम पुन्हा चालु करण्यासाठी श्रीरामपूर, नेवासा भागातील लोकप्रतिनिधींनी 2016-17 च्या अधिवेशनात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांना समक्ष भेटून प्रयत्न केले होते. यासंदर्भात सरपंच सुभाष पवळे, उपसरपंच नितिन काकडे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, दीपक तागडे, मयुर हुंडेकरी, प्रकाश गर्जे यांनी पाठपुरावा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)