वळण आश्रम शाळेत पोषणमास अभियान 

राहुरी – राहुरी तालुक्‍यातील वळण येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत राष्ट्रीय जनजागृती कार्यालय, आदिवासी विकास मंत्रालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आदिवासी विद्यार्थी, आदिवासी नागरिक यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व कुपोषणाचा बिमोड करण्यासाठी सप्टेंबर हा पूर्ण महिना राष्ट्रीय पोषण मास करण्याचे निश्‍चित केले आहे.

त्या अनुषंगाने अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. अभियानाची सुरूवात सहावी ते दहावी मुला-मुलींना रक्‍तवाढ होण्यासाठी फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देऊन करण्यात आली. त्यानंतर मुलांना मोड आलेले उसळ देऊन सकस आहार देण्यात आला. आरोग्य उपकेंद्र मांजरी येथील आरोग्यसेविका खळेकर, लॅब टेक्‍निशिअन थोरात यांच्या टीमने सर्व मुलींची हिमोग्लोबिन तपासणी केली.

अशोक पाटील यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक सुरेश पवार, मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मीना खर्चे, सुरेखा भोई, ज्योती चतारे, निलिमा व्यवहारे, प्रवीण भामरे, संदीप पठारे, जगदीश धिवर, अशोक चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)