राहुरीच्या ९ गावांत छापासत्र

पोलीस प्रशासनाची मोहीम : देशीविदेशी दारू जप्त; 9 जणांविरोधात गुन्हे

राहुरी – गावागावातील अवैध दारूविक्री विरोधात ग्रामसभा ठराव, महिलांचा आक्रमक पावित्रा, आगामी गणेशोत्सव, यातून वाढत असलेली गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी अवैध दारुविक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. एकाचवेळी आठ गावात छापे टाकून देशी, विदेशी बरोबरच हातभट्टीचा साठा मोठ्या प्रमाणावर जप्त केला आहे

तालुक्‍यातील मुसळवाडी, निंभेरे, केंदळ खुर्द, पिंप्री अवघड, रेल्वे स्टेशन, देसवंडी, वांबोरी, मांजरी आदी गावांमध्ये छापे टाकून 9 जणांवर राहूरी पोलिस ठाण्यात दारुबंदी कायदा कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक शिळीमकर यांना तालुक्‍यातील विविध ठिकाणी विनापरवाना राजरोसपणे अवैध दारू विक्री सर्रास सुरू सुरू असल्याचे समजते. त्यांनी अनेक ठिकाणी एकाचवेळी छापा घालण्याचे ठरविले. त्यानुसार अवैध दारू व्रिकी करणाऱ्या नऊ गावात नऊ ठिकाणी त्यांनी छापे घातले.

निंभेरे येथील जनार्दन पंडित, केंदळ खुर्द येथील कचरू गोपीनाथ पवार, मुसळवाडीस्थित महादू आनंदा राऊत, पिंप्रीअवघड येथील किशोर नवनाथ जाधव, बबन गुलाब बर्डे, गौतमनगर रेल्वे स्टेशन येथील लक्ष्मण काशिनाथ खिलारी, देसवंडी येथील कमलाकर बापुराव शिंदे, गोंधळगल्ली वांबोरीस्थित अनिल बाजीराव डुकरे, मांजरी येथील विलास रामदास शेंडगे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक लक्ष्मण भोसले, सतीश शिरसाठ, सहायक फौजदार डी. बी. जाधव, ए. आर. गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुपे, भाबड, आयुब शेख, संजय जाधव, चव्हाण, राठोड, दिवटे, नीलेश मेटकर, बनसोडे, पाडोळे, खरात, गुंजाळ, रोहोकल आदींचा सहभाग होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)