आरडगाव येथील वाळूलिलाव बंद करावा

file photo

राहुरी – आरडगाव येथील वाळू लिलाव बंद करण्यात यावा, तसेच एका ठिकाणची परवानगी व दुसऱ्या ठिकाणावरून वाळू उपसा चालू असून त्याची लांबी रुंदी व उंची लिलाव धारक यांना शासनाने ठरून दिलेल्या नियमाच्या पलीकडे जाऊन लिलाव चालू आहे, वाळू लिलाव तत्काळ बेकायदेशीर ठरवून बंद करण्यात यावा व संबंधित वाळू लिलाव धारकांवर कायदेशीर कारवाई करून लिलाव बंद करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

आरडगाव हे गाव पर्यावरणाच्या सौंदर्याने नटलेले असून शेतातील बेकायदेशीर माती मिश्रित वाळू उपसा चालू असून सदर वाळूचा मर्यादेपेक्षा जास्त खोलीने उपसा झाला, तसेच वाळू गौण खनिज असून विनापरवाना उपसा चालू आहे व त्यामुळे गावातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, पर्यावरण संतुलनात बिघाड होत आहे. जमीन नापीक होत आहे. याबाबत येत्या 8 दिवसांत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने खळ खट्ट्याक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते, उपशहाराध्यक्ष विजय पाटील, तालुका सचिव प्रदीप धनवडे, शहर सचिव अक्षय सत्रे, अरुण चव्हाण, भाऊ उंडे, राजू आदगले, अनिल खैरे, अनिल डोळस, अनिल गीते, अमर देठे, योगेश देवरे, अंकुश गाडे, सद्दाम शेख आदी मनसैनिक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)