धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारकडून निव्वळ थापा – पडळकर

राहुरीत धनगर समाज मेळावा

राहुरी विद्यापीठ – धनगर समाज आरक्षणाबाबत भाजप सरकारकडून थापा मारण्याचे काम सुरू आहे. सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आगामी निवडणुकात भाजप सरकारचा पराभव केला जाईल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला. राहुरी येथे आयोजित केलेल्या धनगर समाज मेळाव्यात ते बोलत होते.

पडळकर म्हणाले, धनगड व धनगर हा एकच असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आरक्षणाबाबत चालढकल सुरू आहे. धनगर आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यापासून धनगर समाज बांधवाच्या आरक्षण मागणीचे आंदोलन सुरू होऊन धनगर बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन बसणार आहे.

धनगर आरक्षणाबाबत भाजप सरकारची चालढकल सुरू असल्याने आगामी कालावधीत घरासमोर काळ्या गुड्या उभारून राज्यकर्त्यांचा निषेध करा. आरक्षण नाही तर अगामी निवडणुकात मते देखील नाही, हे स्पष्ट करत धनगर समाजाला इतर मागासवर्गीय आरक्षण मिळाले नाही तर आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान करू नका असे आवाहन पडळकर यांनी केले.

यावेळी उत्तमराव जानकर म्हणाले, धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची गरज नाही. धनगर समाजातील गटातटाचा फायदा राज्यकर्त्यांनी घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी धनगर समाजाला इतर मागासवर्गीय आरक्षण न मिळाल्यास महाराष्ट्रातील खासदार व आमदारांचा समाज बांधव पराभव करतील.

या मेळाव्यास धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर, कुरणवाडीचे सरपंच आण्णासाहेब खिलारी, संजय तमनर, अविनाश बाचकर, रावसाहेब तमनर, गणेश चितळकर, डॉ. सुभाष मोरे, आण्णासाहेब बाचकर यांसह धनगर समाज बांधव उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या वैशाली नान्नोर, धनगर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, प्रा. संजय तमनर,नारायण तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, अविनाश बाचकर, दत्ता खेडेकर यांनी मेळावा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)