राहुरी खुर्द येथे चोरी 

राहुरी विद्यापीठ – तालुक्‍यातील राहुरी खुर्द येथील रहिवाशी व राहुरी विद्यापीठचे कर्मचारी अनिल पांडूरंग जवणे यांच्या घरातून मध्यरात्री दागिने, रोख रक्कम व तीन मोबाईल असा लाखभर रुपयाचा ऐवज चोरांनी चोरल्याची घटना घडली. याबाबत राहुरी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की राहुरी खुर्द येथील दत्त वसाहतीत राहणारे अनिल जवणे व त्यांचे कुटुंबीय गाढ झोपेत असताना पहाटे तिनच्या दरम्यान चोरट्यांनी पाठीमागील बाजूचा दरवाजा कटवनीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.
चोरांनी जवणे यांच्याकडे पाहुणी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने व चांदीचे दागिने तसेच इतर रोख रक्कम व तीन मोबाईल असा लाखभर रुपयाचा ऐवज घेऊन पोबारा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काहीतरी वाजल्याचा आवाज आल्याने जवने यांच्या कुटूंबातील महिलेला जाग आली. त्यानंतर झालेला चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. जवणे यांनी सुरक्षा रक्षकाला बोलावत पोलीस पाटलाशी संपर्क केला. पोलीस पाटलांनी राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क केला. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले,परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)