शिवरायांच्या विचारांचा जागर व्हायला हवा – राहुल सोलापूरकर

शेवगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक सोहळा समितीचे व्याख्यान

शेवगाव  – शिवरायांची प्रतिमा बाईकच्या मागे लावून त्यांचा आदर्श इतका स्वस्त करू नका. तो आपल्या रक्‍तात भिनावा. केवळ मिरवणुका काढून शिवरायांच्या नावाचा जयघोष करण्याऐवजी छत्रपतींच्या आचार-विचारांचा जागर व्हायला हवा, असे आवाहन सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी येथे केले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज विशेषांक सोहळा समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वराज्यासाठी पुत्राच्या बलिदानाची ही पर्वा न करणाऱ्या जिजाऊ आज दुर्मिळ झाल्याची खंत व्यक्‍त करून सर्व जातीधर्माच्या माणसांना एकत्र करून राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकारण्याची शिवनिती आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धशास्र परदेशात आजही शिकविले जात असल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले.

शिवरायांचे बालपण, तरुणपण, राजीनिती, प्रजेच्या सुखासाठी त्यांची तळमळ, त्यांच्या विविध युद्धनीती आदीबाबींवर त्यांनी त्यांच्या खास शैलीस प्रकाशझोत टाकला. हिंदवी स्वराज्य निर्मिती मागची त्यांची विचारसरणी व्याख्यानातून त्यांनी स्पष्ट केली.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक डॉ. रवींद्र साताळकर, जोग महाराज संस्थेचे राम महाराज झिंजुर्के, मिलिंद शेटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. कृष्णा देहाडराय, प्रा. ज्ञानदेव वंजारी, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, नगरसेवक अरुण मुंढे, सागर फडके, अजिंक्‍य लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)