प्रलंबित कालव्यांची कामे पुर्ण करा – ना. शिवतारे

राहाता – गेल्या 48 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कालव्यांची कामे एका वर्षात तत्काळ पूर्ण करण्याच्या व कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे न करता खुल्या पद्धतीने करण्याची सूचना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. निळवंडे कालव्यांच्या प्रश्नासंदर्भात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या दालनात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

सद्य परिस्थितीत धरण पूर्ण क्षमतेने भरले असून कालवे नसल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, सध्याच्या मंजूर प्रकल्पातील खर्चानुसार पारंपारिक कालवेच सरकारला परवडणारे आहेत, तसेच बंदिस्त पाईपलाईन वास्तवाला धरुन नाही व अतिरिक्त खर्च करुन ती जमीन शेतकऱ्यांना कसताही येणार नाही, त्यामुळे उपलब्ध निधीनुसार पारंपरिक कालव्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना यावेळी शिवतारे यांनी दिल्या.

लाभक्षेत्राला निळवंडेचे पाणी मिळावे यासाठी राजकारण विरहीत बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सकारात्मक झाली असून पुर्वीपेक्षा कामांची गती वाढणार आहे.
– सदाशिव लोखंडे, खासदार, शिर्डी.

-Ads-

संबंधित न्यू अशियन कंपनीचे ठेकेदारांनी वर्षभरामध्ये कालव्यांची कामे पूर्ण करावीत अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण स्वतः अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना भेटणार असून त्यानंतरही आवश्‍यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कालव्यांची कामे सुरू होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

या बैठकीसाठी खा. सदाशिवराव लोखंडे, आ.स्नेहलता कोल्हे, आ.राजाभाऊ वाजे, निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, सुकलाल गांगवे, दत्ता भालेराव, राजेंद्र सोनवणे, दिनेश कडलग यांच्यासह अहमदनगरच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, संगमनेर चे कार्यकारी अभियंता रविंद्र बागुल आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)