शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

राहाता – राहाता तालुक्‍यातील राजुरी येथे शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की राजुरी येथील शेतकरी शिवाजी दादा गोरे सकाळी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. समोरून येणाऱ्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्यामुळे गोरे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीरामपूर येथे उपचार सुरु आहेत.

दोन दिवसांपूर्वी त्यांचे मोठे बंधू नानासाहेब विहिरीवर गेले असता, त्यांनाही बिबट्याने दर्शन दिले होते. परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी त्याला पिटाळून लावले होते. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्या बंधूवर बिबट्याने हल्ला केल्याने ते पूर्ण भयभीत झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजुरी व परिसरातून अनेक बिबटे जेरबंद केले आहेत. राजुरी, गोल्हारवाडी, ममदापूर, नांदूर, बाभळेश्वर, वाकडी, निर्मळपिंपरी परिसरात अनेक बिबटे आहेत. वनखात्याने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळे पिंजरे लावण्याची मागणी करूनही पिंजरे लावण्यात येत नाही. परंतु बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्यानंतर हे अधिकारी पिंजरे लावण्याची तत्परता दाखवतात.बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे राजुरी परिसरात महिला, शाळेतील मुले, शेतकरी भयभीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)