शेतमाल प्रश्नावर काँग्रेस नेते गप्प – रघुनाथ पाटील

आगामी निवडणुका लढविण्याचा शेतकरी संघटनेचा निर्धार
 
शिर्डी – खोटे आश्‍वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. मोदी सरकार शेतकरी विरोधी भुमिका घेत असून यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. शेतमालाच्या प्रश्‍नावर कॉंग्रेस नेते गप्प आहे. आता शेतकरी संघटनेलाच यासाठी पर्याय उभा करावा लागणार आहे. त्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणूक शेतकरी संघटना लढविणार आहे, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

पाटील म्हणाले, यापुर्वी राज्यात व देशात कॉंग्रेसचे सरकार होते. गेल्या पाच वर्षांपासुन भाजपचे सरकार आहे. वेळोवेळी सरकारे बदलली गेली. परंतु धोरणे बदलली जात नाही. पाकिस्तानातुन कांदा 48 रुपये किलो दराने आयात केला. शहरी लोकांना शेतमाल स्वस्तात विकुन खुश करण्याचे काम हे सरकार करत आहे. कांद्याला भाव बांधुन द्यायला सरकार तयार नाही. मगरी, बिबटे, वाघ, ससे, कुत्रे यांना अभय देण्यासाठी सरकारने कायदे केले आहे. परंतु शेतकऱ्यांना अभय देण्यासाठी कायदा नाही. न्यायालय या प्रश्‍नात लक्ष घालण्यास तयार नाही. या सर्व बाबींवर शेतकऱ्यांची मुले आता विचार करत आहे.

ऊसाच्या भावाच्या संदर्भात कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे भाव देता येणार नाही. यात सुट मिळावी, अशी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.केंद्र सरकारच्या एफआरपी कायद्यापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव देता येणार नाही, असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे.

बाजार समित्यात विकलेल्या शेतमालाचे 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही. संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कॉंग्रेस नेते गप्प आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या हा प्रश्‍न या सरकारला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्त्येचा हा कलंक पुसण्यासाठीच शेतकरी संघटनेने लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)