विभागात माहिती न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयात एकाचा गोंधळ

मुकुंदनगरमधील एकाविरोधात गुन्हा दाखल

भिंगार – महिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने सार्वजनिक बांधकाम कार्यालयात गोंधळ घालून कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत अंगार धावून जाण्याचा प्रकार झाला आहे. सुरेश तुकाराम राऊत यांच्या फिर्यादीवरून मोईन अब्दुल लतीफ देशमुख (रा. गजानन हॉस्पिटल सोसायटी, मुकुंदनगर) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-

मोईन याने 24 ऑगस्टला कार्यालयीन पत्रव्यवहाराची माहिती मागितली होती. माहिती अधिकारात कार्यालयातील पत्रव्यवहाराची संपूर्ण माहिती देता येत नाही, असे सुरेश यांनी मोईन याला सांगितले. माहिती निरंक अशी देत कोणत्या व्यक्तीची माहिती पाहिजे, अशी विचारणा मोईन याला सुरेश यांनी केली.

मोईन याने यावर अरेरावीची भाषा सुरू केली. आरडाओरडा करत गोंधळ घातला. त्यानंतर सुरेश यांच्या अंगावर धावून गेला. शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणला. सुरेश राऊत यांनी या प्रकाराची भिंगार कॅम्प पोलिसांकडे तक्रार केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)