नगर-पुणे रेल्वेच्या कॉडलाईनचे काम लवकरच पूर्ण होणार

File photo

नगर : नगर-पुणे रेल्वेच्या कॉडलाईनच्या कामासाठी आतापर्यंत जवळपास नव्वद टक्के भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनासाठी ज्या शेतकऱ्यांचा अडचणी आणि तक्रारी होत्या, त्यांच्यासमवेत यशस्वी चर्चा करून तोडगा काढण्यात आला. त्यामुळे आता लवकरच नगर-पुणे रेल्वे कॉडलाईनचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

नगर-पुणे रेल्वेच्या कॉडलाईनच्या सुरू असलेल्या कामाबाबत खा. गांधी यांच्या सूचनेनुसार पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तेथील जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, इंदापूरचे प्रांताधिकारी संजय अस्वले, रेल्वे मंडळाचे आर. एन. गुप्ता आदींच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कॉडलाईनमुळे नगरकरांचा पुण्याचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दीड-दोन तासांत आता पुण्याला जाणे शक्‍य होणार असल्याने नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे. त्याचा परिणाम नगर-पुणे रस्त्यावरील रहदारीवरही होणार असल्याने अपघांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल, असे खा. गांधी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)