श्रीगोंद्यात प्राध्यापकांच्या संपास विद्यार्थ्यांचा पाठिंबा

विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन

श्रीगोंदे -प्राध्यापकांच्या रिक्‍त जागा त्वरित भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, घड्याळी तासिका व करार तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, 2013 पासुनचे 71 दिवसांचे थकीत वेतन, जुनी पेन्शन, विद्यापीठाच्या अधिकार मंडळावरील गोंधळ आदि मागण्यांसाठी गेल्या मंगळवारपासुन वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून प्राध्यापकांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत.

आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून कॉलेजमध्ये विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना जादा लेक्‍चर घेण्याची विनंती करीत आहोत. लवकरात लवकर तोडगा निघाल्यास कॉलेज प्रशासनासमोर निर्माण झालेला पेच सुटू शकतो. – डॉ.एल.आर.पाटील

-Ads-

 

प्राध्यापक संघटनेच्या मागण्या रास्त असुन सरकारने या मागण्यांची दखल घेऊन लवकरात लवकर हे आंदोलन संपवावे. जेणे करून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
– मंगेश डोके ,विद्यार्थी प्रतिनिधी

येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा कामकाजावरही परीणाम झाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा सुरू असुन, त्यासाठी मात्र प्राध्यापक सहकार्य करीत आहेत. येथील आंदोलनास डॉ. एल .आर. पाटील, डॉ.साळवे, डॉ. एन. एम.थोरात, डॉ. पठाडे, बहीरम, लबडे आदि शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)