प्राध्यापकांचे ना. विखेंना निवेदन; बेमुदत काम बंद आंदोलन

नगर – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे नगरमध्ये आले असता वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. मंचरकर, प्रा. पोकळे, प्रा. सागडे, प्रा.बगाडे यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाबाबत त्यांना निवेदन दिले. यावेळी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, आमदार भाऊसाहेब कांबळे, धनंजय जाधव आदी उपस्थित होते. दि. 25 सप्टेंबरपासून एम. पुक्‍टो.च्या आदेशानुसार वरीष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बेमुदत काम बंद आंदोलन करत आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.

नविन प्राध्यापक भरती त्वरीत सुरु करावी, सी. एच. बी. कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवावे, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, 71 दिवसांचे हक्काचे वेतन मिळावे, 7 वा वेतन आयोग लागू करावा, विद्यापीठाच्या आधिकार मंडळावरील नामनिर्देशनातील गोंधळ व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना नियमित वेतन आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.

या आंदोलनाला संस्थाचालक व विद्यार्थी संघटना व विनाअनुदानित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पाठींबा मिळत आहे. प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होवून शासनाकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार आहे. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शासनच जबाबदार राहील. शासनाने लवकरात लवकर या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा, असे चर्चेत प्राध्यापकांनी ना. विखेंना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)