#प्रभात_प्रभाव : त्या मायलेकरांच्या मदतीला सरसावले मदतीचे हात

पाथर्डी  – अपंग रामा काळोखे व त्याची वृद्ध आई अक्षरशः भीक मागून जगत होते. याबाबत मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीने टेकले हात या मथळ्याखाली दैनिक प्रभातमधून त्यांची व्यथा मांडण्यात आली होती. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या मायलेकरास मदतीचे हात पुढे आले आहेत. जिजाऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी शांताबाई काळोखे यांना साडी-चोळी व रामास नवीन पोशाख भेट दिला. तसेच घरकुलाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून पालिकेकडून मंजुरी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.

जिवंत आहे म्हणून जगायचे, हा एकमेव आशावाद ठेवून नैराशेत जगणाऱ्या काळोखे मायलेकरांना नगरसेवक राजगुरू यांच्या रूपाने भक्कम आधार मिळाला आहे. मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीने टेकले हात! या मथळ्याखाली दै . प्रभातने दिवाळीपूर्वी काळोखे मायलेकरांची कर्म कहाणी प्रकाशित केली होती. या मायलेकराच्या जीवनातील खरे वास्तव वाचून अनेकांना धक्काच बसला. त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपात अनेकांनी मदत देऊ केली.

नगरसेवक राजगुरू यांनी काळोखे मायलेकरांना दिवाळीसाठी नवीन पोशाख खरेदी केला. मात्र याच काळात शहरांमध्ये भिक्षा जास्त मिळते, या आशेने काळोखे मायलेकरे पुणे येथे गेली. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही कपडे व दिवाळीच्या फराळाची मदत देता आली नाही.

दिवाळीनंतर आज रामा काळोखे व शांताबाई काळोखे पाथर्डी आले. नगरसेवक राजगुरू यांनी त्यांना दिवाळीसाठी खरेदी केलेला पोशाख भेट दिला. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या विविध अडचणी विषयी चर्चा केली. यावेळी राजगुरू यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, पत्रकार बाबासाहेब गर्जे, सामाजिक कार्यकर्ते सागर गायकवाड, पंकज गांधी, समीर आतार, भाऊ टकले आदी उपस्थित होते.

मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीनेही टेकले हात!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)