प्रारूप प्रभाग रचना
– प्रभाग : 17
– सदस्य : 68
– लोकसंख्या : वीस हजार
– हरकती : 85

नगर  – महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर आज शासकीय विश्रामगृह येथे सुनावणी होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून या सुनावणींना सुरूवात होईल. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आणि डिसेंबरमध्ये महापालिकेची होणाऱ्या निवडणुकीचे गणेशोत्सवा अगोदरच पडघम वाजू लागले.

महापालिकेची डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहिर केला आहे. 17 प्रभाग करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. सदस्यांची संख्याही 68 असणार आहे. या प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस पडला आहे. सुमारे 85च्या आसपास हरकती आल्या आहेत. त्यात विशेष मागसवर्गीय संघासाठी हरकत आहे. सावेडी गावठाण हा नगरपालिकेत असल्याची देखील हरकत आहे.

जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, महावीर पोखरणा, संजय घुले, श्रीपाद छिंदम, दिंगबर ढवण, दिगंबर गेंट्याल यांच्यासह अनेकांनी हरकती नोंदविल्या आहेत. या हरकतींवर आज (बुधवारी) शासकीय विश्रामगृह येथे सकाळी दहा वाजल्यापासून हरकतींवर सुनावणीस सुरूवात होणार आहे. राज्याचे वित्त विभागाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांच्यासमोर या हरकतींची सुनावणी होणार आहे. या हरकतींवर सुनावणीसाठी प्रशासकीय पातळीवर काही अटी घालण्यात आल्या आहेत. जास्त स्वाक्षरींच्या हरकतींवर सुनावणीसाठी फक्त दोघांनाच उपस्थित राहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)