प्रभाग रचनेवर छिंदम याने घेतली हरकत

51 हरकती दाखल : दि. 15 सप्टेंबरपर्यंत सुनावणी

नगर – महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात 51 हरकती दाखल झाल्या आहेत. आज अखेरच्या दिवशी श्रीपाद छिंदम यानेही प्रभाग रचनेवर आक्षेप घेतला. दि. 27 ऑगस्टपासून प्रभाग रचरनेसंदर्भात हरकती दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. आज (दि.5) दुपारी 3 वाजेपर्यंत अखेरची मुदत होती.

आज झेंडीगेट प्रभाग कार्यालयात हुच्चे जगन बबनराव यांनी हरकत दाखल केली. श्रीपाद शंकर छिंदम, राहुल सुरेश मोहिते, मालन सुरेश ढोणे, संजय राधाकिसन वल्लाकट्टी, बाळासाहेब चंद्रकांत शेळके यांनी माळीवाडा प्रभाग कार्यालयात हरकत दाखल केली.

तायगा बापू शिंदे, सतीश तायगा शिंदे, दिनकर मारुती सोनवणे यांनी सावेडी प्रभाग कार्यालयात तर चंद्रकांत खटके, अमोल भानुदास घोडके, विशाल नामदेव लोळगे, सुनीता वसंत कोळेकर, अरुण मारुती जाधव, अमोल शिवाजी येवले, वैभव अणुरुथ कदम यांनी केडगाव-बुरुडगाव प्रभाग कार्यालयात हरकत दाखल केली. कालपर्यंत 35 हरकती दाखल झाल्या होत्या.

या हरकतींवर दि. 15 सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयुक्‍त अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)