नगर – पोस्ट मास्तर जनरल, यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विभागीय डाक अदालत पुणे यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे. डाक सेवेबाबत आपली तक्रार सहा आठवडयापेक्षा जास्त काळ अनुत्तरीय असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी डाक अदालत मध्ये दाद मागता येवू शकते .

त्यासाठी अनुत्तरीत तक्रारीबाबतचा अर्ज त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिका-याकडे दाखल केली त्यांचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख, एका अर्जासोबत एकाच तक्रार असावी, आपली तक्रार दिनांक 7 सप्टेंबर 2018 पर्यत सहाय्यक निर्देशक डाक सेवा पोस्ट मास्तर जनरल पुणे यांचेकडे सादर करावी.

या तारखेनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा डाक अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर , यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)