पेमेंटस बॅंकमुळे पोस्ट खात्याला संजीवनी

खा.दिलीप गांधी : नगर , श्रीरामपूर शाखांचे लोकार्पण

नगर – पोस्ट खाते हे शेकडो वर्षांपासून सर्वसामान्यांचा आधार व विश्‍वास असलेले खाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर पोस्ट खात्याकडे विशेष लक्ष देऊन मोठे अमुलाग्र बदल केले आहेत. आता इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक सुरु करुन पोस्ट खात्याला संजीवनी दिली आहे. या बॅंकेमुळे अतिसामान्य नागरिकही आता बॅंकेस जोडला जाणार आहे. ही वैशिष्ट्‌यपूर्ण बॅंक नागरिकांच्या दरातच आल्याने सर्वसामान्यांना बचतीची सवय होणार आहे. या बॅंकेमुळे पोस्ट खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तसेच पोस्टमनचीही जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे अधिक चांगली व तत्पर सेवा द्यावी. अत्यंत सुलभ व सोप्या पद्धतीने या बॅंकेत खाते उघडता येत असल्याने सर्व नागरिकांनी या बॅंकेत खाते उघडावे, असे प्रतिपादन खा.दिलीप गांधी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीदिल्ली येथे इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंकेच्या देशातील 650 बॅंक शाखांचे एकाचवेळी दिल्ली येथून लोकार्पण केल्यावर नगर येथील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयातही सुरु करण्यात आलेल्या नगरच्या शाखेचे लोकार्पण खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व बायोमेट्रिक मशिनद्वारे खाते उघडून झाले. यावेळी वरिष्ठ पोस्ट अधिक्षक जालिंदर भोसले, बीएसएनएलचे महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी, वरिष्ठ पोस्ट मास्टर एस.रामकृष्णा, उपाधिक्षक एरंडे, भाजपा गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, चेतन जग्गी, वसंत राठोड, राहुरी भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, प्रशांत मुथा आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक व पोस्ट खात्यातील कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी प्रास्तविकात संदिप हतगल यांनी इंडिया पोस्ट पेमेंटस् बॅंकेबद्दल सविस्तर माहिती देतांना सांगितले की, प्रत्येक सामान्य नागरिक बॅंकेशी जोडला जाणे हाच या बॅंकेचा मुख्य हेतू आहे. आपली बॅंक आपल्या दारात या विचाराने पोस्ट खात्याचे तीन लाखाहून अधिक पोस्टमन, डाकसेवक आता बॅंकींग सेवा देणार आहेत. यासाठी प्रत्येकाला मोबाईल व बायोमेट्रिक मशिन देण्यात आली आहे. जेणेकरुन त्वरित कोठेही या बॅंकेत खाते उघडता येणार आहे. पूर्णत: पेपरलेस कामकाज या बॅंकेमार्फत होणार आहे. नगर जिल्ह्याचा विस्तार जास्त असल्याने नगर शहर व श्रीरामपूर अशा दोन शाखा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)