अभ्यासाबरोबरच खेळांकडेही लक्ष द्या

पोपट पवार – कर्मवीर जयंतीसह रयत शताब्दी महोत्सव

भाळवणी – विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळांकडेही लक्ष द्यावे. सामाजिक व पर्यावरण याविषयी विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन आदर्श गाव प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी केले.
भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटिल यांची 131 वी जयंती सोहळा व रयत शताब्दी महोत्सव आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर झावरे, उल्का उद्योग समूहाचे गोरख रोहोकले, माजी विद्यार्थी नाशिकचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य बी.वाय. पांडुळे यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक पी.एल. पांडुळे यांनी अहवाल वाचन केले.

यावेळी विविध स्पर्धा- परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारीतोषिकांचे वितरण करण्यात आले. सल्लागार समितीचे सदस्य बुढन शेख यांनी विद्यालयास एक संगणक संच भेट दिला. गोरख रोहोकले यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 250 रुपये देण्याचे जाहीर केले.

विद्यालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष मुरली रोहोकले, गंगाराम रोहोकले, सुकाभाऊ रोहोकले, सरपंच लिलाबाई रोहोकले, उपसरपंच संदिप ठुबे, केरु रोहोकले, खरेदी विक्री संघाचे संभाजी रोहोकले, अशोक रोहोकले, बाबाजी तरटे, सुलतान शेख, प्राथमिक शिक्षक बॅंकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले, अर्चना वाखारे, उद्योजक मधुकर रोहोकले, संदिप कपाळे, धोंडीभाऊ गायकवाड, बी. आर. रोहोकले, बी.वाय. रोहोकले, श्रीरंग रोहोकले, राजेंद्र चेमटे, संतोष पारख हे यावेळी उपस्थित होते. एकनाथ ठुबे, अमोल भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. के. झरेकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)