आमदार ‘मुळा’चे पाणी वळवताहेत इतरत्र

नगर : मुळा धरणाचे आवर्तन सुुरू होऊन महिना झाला असताना पाथर्डी शाखेवरील वितरिका क्रमांक दोनला तातडीने पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब गुंजाळ व उपकार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले.

संजय कोळगे यांचा आरोप : सिंचन भवनावर मोर्चाचा इशारा

नगर – मुळा धरणाचे आवर्तन सुरू होऊन महिना लोटला असताना पाथर्डी शाखेवरील वितरिका क्रमांक दोनला तातडीने पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुळा पाटबंधारे विभागाचे उपाभियंता भाऊसाहेब गुंजाळ व उपकार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याकडे केली. राजकीय द्वेषातून पाणी अन्यत्र वळविले जात असल्याचा आरोप करून हे थांबले नाही, तर सिंचन भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. या वेळी कारभारी लांडे, राजेंद्र देशमुख, लक्ष्मण पाटेकर, महेश नांगरे, सुनील जाधव, धनंजय गरड, रोहन साबळे, सुधाकर कुडेकर, गणेश कोळगे, विष्णू मुटकुळे, बाबासाहेब कोळगे, सुधाकर पुंडेकर, संदीप तागड, नीलेश अकोलकर, भीमराज खेडकर, साईनाथ गरड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

राजकीय द्वेषातून लोकप्रतिनिधी दबावतंत्राचा वापर करून काही गावांचे पाणी दुसरीकडे वळवत असल्याचा आरोप करण्यात आला. येत्या दोन दिवसांत वितरिका क्रमांक दोनला पाणी न सोडल्यास माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवनावर मोर्चा काढण्याचा व या गावांना सिंचन न केल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

मुळा धरणाचे आवर्तन सुरू महिना झाला आहे. धरणाच्या सिंचन क्षेत्राच्या नियमानुसार “टेल टू हेड’ प्रमाणे सिंचन करणे गरजेचे असते; परंतु अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे वितरिका क्रमांक दोनला अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ राजकीय द्वेषाने दिंडेवाडी, वडुले, गरडवाडी, ढोरजळगाव, आव्हाणे, बऱ्हाणपूर व सामनगाव परिसराला आजपर्यंत पाणी मिळालेले नाही. सुरुवातीला तीन ते चार दिवस मळेगाव याठिकाणी पाणी सोडले होते; मात्र हे पाणी बंद करून दुसरीकडे वळविण्यात आले आहे.

गावांना सिंचनापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. या सर्व गावांचे सिंचन पूर्णपणे झाल्याशिवाय मुळा धरणाचे पाणी बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून जाणीवपूर्वक या गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. अतिशय कमी दाबाने पाणी सोडून सिंचन पूर्ण केले जात नाही. ही गावे विशिष्ट पक्षाला मतदान करत नसल्याने लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पाणी दुसरीकडे वळवित असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)