पोलिसांकडून रिक्षा चालकांसाठी सहा नियमांची आचारसंहिता

नगर – रिक्षाधारकांनी पोलीस प्रशासनावर केलेल्या आरोपांनंतर पोलीस अधीक्षकांनी आज रिक्षाधारक आणि चालकांसाठी सहानियमांची आचार संहिता जारी करत रिक्षा ,सहा आसनी पॅगो, प्रवासी वाहतूक करणारे यांच्या वरिल कारवाई आणखीन कडक केली आहे. आज रात्री उशीरा पर्यंत वाहतुक शाखेच्या आवारात कारवाई साठी थांबविलेल्या रिक्षांची मोठी रांग लागली होती.

पोलीस अधीक्षकांनी जारी केलेल्या नियमानुसार जे परवानाधारक प्रवासी वाहतुक करणाऱ्यावाहन चालकांनी करारा प्रमाणेच वाहतुक करावी. सर्व रिक्षा चालक खाकी आणि मालक पांढरा गणवेष परीधान करतील. याकरीता 15 सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांणी परवान्याचा बिल्ला, गाडीची मुळ कागदपत्रे जवळ बाळगावयाची आहेत .

गणवेश नसल्यास 200 रुपये दंद करण्यात येणार असून कागदपत्रे बिल्ला नसल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. जादाप्रवासी बसविण्या साठी स्पिकर ,स्टुलचा वापर करूनये. ज्यांनी मागील बाजुस बसण्याची व्यवस्था केली अस्वेल त्यांने ती काढुन टाकावी. रिक्षा चालकाचे आसन कंपनीने दिलेल्या आकाराचेच असावे. परमिटशिवाय कोणीही वाहन रस्त्यावर आणु नये. अन्यथा 2000 रुपये दंड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे रिक्षा चालक आर. टि.ओ. च्या नियमानुसार क्रमांक टाकणार नाहित त्यांना 1000 रुपये दंड केला जाणार आहे.

रिक्षा चालकांसाठी नियमावली जारी करतांनाच ज्या रिक्षात तीन प्रवासी बसलेले असतील त्या वाहनात इतर प्रवाशांनी बसुनये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी नागरीकांना केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)