हद्दपार नगरसेवकासह आठ जण आढळले शहरात

पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाकडून कोम्बिंग ऑपरेशमध्ये अटक

नगर – गणेशोत्सव काळात हद्दपार असतानाही शहरात फिरणाऱ्या नगरसेवकासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. समाजकंटक शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्याची दखल घेत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात माजी नगरसेवकांसह आठ जणांना अटक करण्यात आले.

नगरसेवक आरिफ शेख, गणेश प्रकाश वाळके, नंदू लक्ष्मण बोराटे, परेश खराडे, समीर शेख, हरीश बांदल, युवराज सपकाळ, सनी निकाळजे या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सव व मोहरम सण शांततेत पार पडावेत, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शहरातील तब्बल अडीचशे जणांना प्रांताधिकाऱ्यांनी हद्दपार केले होते. सीआरपीसी कलम 144 (2) अन्वये ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतरही काही जण शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरात कोम्बिंग ऑपरेश केले. त्यात वरील आठ जण आढळून आले. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून संबंधिताविरुद्ध कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)