वादग्रस्त निरीक्षक पोवार राहुरीला

अधीक्षकांनी केल्या चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

नगर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चार पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या बदल्या केल्या आहेत. पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर, राहुरी येथील पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे. श्रीगोंदे पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची बदली सर्वात चर्चेचा विषय ठरली आहे. महसूल विभागाशी त्यांनी घेतलेला पंग्याची ही पावती असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधीक्षर रंजन कुमार शर्मा यांनी या चार पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा काढले.

पारनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हनुमंत गाडे यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पारनेर येथे श्रीगोंदे पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची बदली झाली आहे. श्रीरामपूर तालुक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलत जाधव यांची श्रीगोंदे पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दहशतवादी विरोधी सेलचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची नियुक्ती झाली आहे. दशतवादी विरोधी सेलचा अतिरीक्त पदभार मानव संसाधनचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार श्रीगोंदे पोलीस ठाण्यात असताना ते वादग्रस्त ठरले होते. महसूल विभागाशी त्यांनी पंगा घेतला होता. प्रातंधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर श्रीगोंद्यात वाळू चोरांनी हल्ला केला होता. या हल्ल्याविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. महसूल विभागाने यावर जोरदार आक्षेप घेतला होता. बाजीराव पोवार यांनी महसूलच्या अधिकाऱ्याविषयी केलेल्या विधानाची माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. महसूलच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे रितसर तक्रार केली होती.

तेव्हापासून बाजीराव पोवार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी देखील बाजीराव पोवार यांच्या वादग्रस्त विधाची गंभीर दखल घेतली. पोलीस दलाकडून या प्रकाराची गोपनीय चौकशी सुरू होती. बाजीराव पोवार यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर गोविंद दाणेज यांची लेखी माफी देखील मागितली होती. बाजीराव पोवार यांच्यार कोणत्याही क्षणी कारवाई होईल, असे चिन्ह होते. परंतु पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी वातावरण थंड होऊ देत बाजीराव पोवार यांची बदलीचा आदेश काढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)