नऊ जणांच्या टोळीतील चौघे पसार

स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून पकडली सराईत गुन्हेगारांची टोळी

मोक्का अंतर्गत कारवाईची तयारी

ही टोळी एवढी सराईत आहे की, ती चोरीच्या ठिकाणी जाताना चोरी केलेले वाहन वापरत होती. तिथे चोरी केल्यानंतर परताना ते वाहन तिथेच सोडून द्यायचे. परंतु तेथून दुसरे वाहन चोरून परतायचे, अशी ही चोरीची पद्धत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. या टोळीविरुद्ध मोक्का लावता येतो का, याची देखील तपासणी केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगर – बीडमध्ये घरफोडी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने नगर-मनमाड रोडवरील निंबळक बायपास चौकात सापळा रचून पकडले. जालना व नगरमधील गुन्हेगारांचा या टोळीत समावेश आहे. या टोळीतील नऊ जणापैकी चौघे अंधाराचा फायदा घेऊन निसटले आहे. या टोळीकडून पोलिसांनी तलवार, कुऱ्हाड, तीन सुरे, दोन मोबाईल, स्कू-ड्रायव्हर, मास्टर चावी, तीन मोटार आदी असे एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हरदीपसिंग बबलूसिंग टाक (वय 22, रा. गुरूगोविंदसिंगनगर, जालना), गजानन सोपान शिंगाडे (वय 25, रा. पाचेन वडगांव, जालना), गाण्या शंकर डहाणे ऊर्फ संजय (वय 22, रा. सारोळाबद्धी, ता. नगर), किसन होलसिंग टाक (वय 20, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, ता. नगर) व बोल्हेगाव येथील अल्पवयीन मुलाचा अटक करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. राजेश होलसिंग टाक, सुनीलसिंग जीतसिंग जुनी (दोघे रा. संजयनगर, ता. नगर) व गणेश (रा. शिर्डी) व किशोर (रा. जालना, दोघांचे पूर्ण नाव माहित नाही) हे चौघे जण पळून गेले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या टिमने निंबळक बायपास येथे ही टोळी पकडण्यासाठी सापळा लावला होता. गतिरोधकाजवळ या टोळीची मोटार आल्यावर तिला थांबवण्याचा इशारा पोलिसांनी केला. परंतु टोळीची मोटारगाडी न थांबता निघून गेली. पोलिसांनी या मोटारीची पाठलाग केला. त्यावेळी टोळीतील काही जण चालत्या मोटारीतून उड्यामारून पळून गेले. अंधाराचा फायदा घेत हे चौघे पसार झाल्याचा दावा पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी यावेळी केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे या टोळीतील पाच जणांना देण्यात आले आहे.

अकोले, नेवासा कनेक्शन

हरदीपसिंग बबलूसिंग टाक याच्याविरुद्ध जालना पोलीस ठाण्यात तीन, गजानन सोपान शिंगाडे यांच्याविरोधात तीन, सुनीलसिंग जुनी याच्याविरोधाल अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्‍यात एक, असे गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर या टोळीने नेवाशातील रेवणनाथ जाधव याच्याबरोबर मिळून पुणे, बीड जिल्ह्यातून वेगवेगळ्या वाहनातून जाऊन चोरीचे गुन्हे केले आहेत. असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. पुणे येथे तीन, नगरमध्ये तीन, श्रीगोंदे व नेवासे येथे प्रत्येकी एक, बीडमध्ये तीन असे हे गुन्हे आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)