नगर – दहिहंडी, गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात गावठी दारू बनविणारे सुमारे 172 अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 12लाख 96 हजार 728 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर 72 लाख 13 हजार रुपयांचे दारूचे रसायन नष्ट केले.

श्रीरामपूर, संगमनेर, श्रीगोंदे, राहाता, राहुरी, नगर तालुका, अकोले तालुक्‍यातील गावठी दारू अड्ड्यांवर एकाच वेळी पोलिसांनी छापे घातले. एकाच वेळी कारवाई झाल्याने गावठी दारू बनविणाऱ्यांना पळता भुई कमी झाली. दारू भट्ट्या उद्‌ध्वस्त करण्याबरोबर पोलिसांनी तेथील दारू बनवायचे रसायन नष्ट केले.

त्याचबरोबर काही साहित्य देखील जप्त करण्यात आले. या कारवाईत एमआयडीसी पोलिसांनी 13 जणांना अटक केली. देशी, विदेशी दारू कारवाईत जप्त करण्यात आली. ही कारवाई पुढेही अशीच चालू राहणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)