पोलिसांकडून आदिवासी समाजास मिठाईचे वाटप

कोपरगाव – दिवाळी म्हणजे मंगलदायी चैतन्यरूपी दिव्याची तेजस्वी ज्योत, चराचर उजळून टाकणारा उत्सव, कुबेर अन्‌ लक्ष्मीच्या आराधनेचा शुभपर्वकाळ. सायंकाळी दिवेलागण होताच मनेही प्रज्ज्वलित होतात. फराळाचा गोडवा पोटाची तृप्ती करतो, तर दिव्यांचा प्रकाश अंधार मिटवून टाकतो. या चैतन्यदायी प्रकाशपर्वात आजही अनेक दीन-दुबळे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या काही जातीसमूहांना आला दिवस सारखाच वाटतो.

परंतु अशा दीन-दुबळ्यांनाही मिठाईचा गोडवा चाखायला मिळून ते दिवाळीपासून वंचित राहणार नाही, या भावनेतून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी आपल्या सहकार्यासोबत तालुक्‍यातील पढेगाव येथील आदिवासी पारधी वस्तीवर जाऊन मिठाईचे वाटप केले. या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुळात गुन्हेगारीचा शिक्का पडल्यामुळे समाजाच्या प्रवाहापासून, शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या आयुष्य पालात घातलेल्या या समाजाला अजूनही सणावारांचे तितके महत्त्व वाटत नाही. समाजातील चालीराती बघतच समाधान मानणाऱ्या या पारधी समाजाला पोलिसांची गाडी बघून मनात धस्सं होतं. आज काहीवेळ तस्सं झालही असेल.

परंतु आज पोलिस गाडीसह कर्मचारी आपल्यासाठी मिठाई घेऊन आले, हे पाहून त्यांना सुखद धक्काच बसला. अगदी आनंदाने या समाजातील महिला बालकांनी मिठाईचा स्वीकार केला. यावेळी कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पो. हे. कॉन्सटेबल सुरेश पवार, पोलिस नाईक अशोक शिंदे, आशीर सय्यद, दीपक ढाकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)