केडगाव, सावेडी, नागापूर, भिंगार येथील मंडळांची होणार तपासणी

नगर – गणेशोत्सव कालावधीत अधिकृत व अनधिकृत मंडपांची तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आल्याचे उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली आहे. या तपासणी पथकाची नावे आणि संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार नगर शहरातील विविध विभागातील तपासणी पथकातील सदस्यांची नावे, पदनाम आणि त्यांचा संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.

नालेगाव- राजेंद्र आंधळे (महसूल मंडळाधिकारी), संजय उमाप (मनपा लिपीक), सचिन गोरे (पोलीस कर्मचारी) व श्रीमती वाय. सी. मगर (आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक), केडगाव- एल. एम. रोहकले ( महसूल मंडळाधिकारी), एन .के. देशमुख (मनपा लिपीक) तन्वीर शेख (पोलीस कर्मचारी) व एस. एम. जाधव (आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक), सावेडी- दीपक कारखीले (महसूल मंडळाधिकारी), आकाश कांबळे (मनपा लिपीक), अजय गव्हाणे (पोलीस कर्मचारी) व श्रीमती श्‍वेता कुलकर्णी (आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक), नागापूर – एस. आव्हाड (महसूल मंडळाधिकारी), अमोल कोतकर (मनपा लिपीक), एम. पी. पांढरकर (पोलीस नाईक) व एन. वाय. इंजापुरे (आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक), भिंगार- रिजवान शेख ( महसूल मंडळाधिकारी), सागर सुद्रीक (मनपा लिपीक), नवनाथ धोंडे (पोलीस कॉन्स्टेबल), फिरोज शेख (आरटीओ सहायक मोटार वाहन निरीक्षक) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)