नगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र थांबायला तयार नाही. पितळे कॉलनीत दिवसाढवळ्या धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरांनी दुचाकीवरून येऊन लांबवली. सोनादेवी शर्मा (वय 50, रा. नागापूर) यांच्या गळ्यातून 20 हजार रुपयांची सोनसाखळी चोरांनी चोरून नेली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सोनादेवी या भाजीपाला आणण्यासाठी रस्त्याने पायी चालल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून त्यांच्या मागून आलेल्या दोघा चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. आठवड्याभरात धूमस्टाईलने चोरी करण्याची ही दुसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)