गोपाळपूर – नेवासे तालुक्‍यातील पिंप्री शहाली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांनी लाल मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशाच्या विविध रूपातील गणेशमूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांना शाळेच्या शिक्षिका आरती वाघचौरे व सीमा शहाणे यांनी मार्गदर्शन केले.

स्वतःच्या हाताने बनविलेल्या मूर्तींची गणेश चतुर्थीला विद्यार्थ्यांनी घरी प्राणप्रतिष्ठापणा केली. या कार्यशाळेतून मुलांमध्ये सुप्त कल्पना शक्‍ती, सृजनशक्‍ती पहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते.

उत्कृष्ट मूर्तीस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन नवथर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक एकनाथ राव, चंदकांत गोरे, संतोष दहिवाळ, नवनाथ काळे, संजय अंधारे, नितीन वाघमारे, विठ्ठल काळे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)