पेन्शनर्सचे प्रश्‍न सुटण्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडणार

नगर – देशात 62 लाख पेन्शनर्स आहे. पेन्शनधारकांचे सर्व प्रश्‍न निकाली काढल्यास सत्ताधाऱ्यांना प्रचाराची वेळ येणार नाही. देशाला मोठे करण्यास पेन्शनर्सचा मोठा सहभाग आहे. देशातील पेन्शनर्स राष्ट्र निर्माणासाठी श्रमदान करण्यास तयार असल्याचे स्पष्ट करीत, या श्रमदानातून ते शासनाच्या कल्याणकारी योजना यशस्वी करण्यास हातभार लावणार आहे. त्या मोबदल्यात वाढिव पेन्शन व महागाई भत्ता मिळण्याची मागणी त्यांनी केली. तसेच दिल्ली येथे मुख्य प्रोव्हीडंट फंड कार्यालया समोर झालेल्या आंदोलनाची माहिती देत सप्टेंबर पर्यंन्त शासनाने पेन्शनर्सचा प्रश्‍न न सोडविल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा कमांडर अशोक राऊत यांनी दिला.

पेन्शनरांचे विविध प्रलंबीत मागण्या शासन स्तरावर सोडविण्याच्या दृष्टीकोनातून ईपीएस 95 पेन्शनर्स कल्याणकारी संघटनेचा जिल्हाव्यापी मेळावा शहरातील अक्षता मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सप्टेंबर पर्यंन्त पेन्शनर्सचे प्रश्‍न न सुटल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. जो पेन्शनर्स का काम करेंगा, वही देश पे राज करेंगा! च्या घोषणांनी सभागृह दणानून सोडला.

या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.दिलीप गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखदेव आहेर हे होते. प्रास्ताविकात संघटनेचे अध्यक्ष सुभाष पोखरकर यांनी पेन्शनर्सच्या न्याय हक्काच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहे. या मागण्या मान्य होई पर्यंन्त केंद्र सरकारशी लढा चालू राहणार आहे. बऱ्याच पेन्शनर्सना आपली मुळ पेन्शन किती हे माहित नाही. व्यक्तीगत पातळीवर पेन्शनर्सचे अनेक प्रश्‍न आहे. हे प्रश्‍न स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी तालुका पातळीवर बैठका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील 60 वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनी पेन्शनर्सची चेष्टा केली. त्यांच्या प्रश्‍नाची जाणीव ठेऊन भाजप सरकारने 10 हजार रु. पर्यंन्त पेन्शन दिली. सैन्यासाठी वन रॅंक वन पेन्शन योजना लागू केली. बंद पडलेले अनेक प्रकल्प कार्यान्वीत केले. जनतेच्या भावनेशी एकरुप होऊन सरकार काम करत आहे. पेन्शनर्सचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकार प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असून, हे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे खा.दिलीप गांधी यांनी आश्‍वासन दिले.

या मेळाव्यात जिल्ह्यातील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी, वीज महामंडळ, शेती महामंडळ, साखर कामगार, विडी कामगार, वस्त्र उद्योग, साई संस्थान, हॉस्पिटल, सहकारी बॅंका, सेवा सोसायटी, पतसंस्था, संघ, फेडरेशन, सहकारी संस्था, एमआयडीसी मधील सेवानिवृत्त कामगार सहभागी झाले होते.

कमीतकमी 7 हजार 500 रु. व निगडीत महागाई भत्ता पेन्शन मिळावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे प्राव्ही. फंडाचे दि.23 मार्च 2017 परिपत्रकाप्रमाणे वाढीव पेन्शन मिळावी, 31 मे 2017 चे परिपत्रक रद्द करण्यात यावे, सर्व पेन्शनर्स व त्यांच्या पतकीस दर्जेदार मोफत आरोग्य सुविधा देण्यात यावी, कम्युटेशन, आरओसी व इतर बंद केलेल्या सवलती पुन्हा लागू करण्यात याव्या, पेन्शनरांच्या विधवा पत्नीस 100 टक्के पेन्शन देण्यात यावी, पेन्शन फंडात जमा असलेली रक्कम वारसास परत देण्यात यावी, सेवानिवृत्तीनंतर ज्यांना पेन्शन मिळत नाही त्यांची आवश्‍यक रक्कम घेऊन त्यांना दरमहा 5 हजार रु. पेन्शन मिळण्याच्या मागण्या संदर्भात मेळाव्यात चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)