पेन्शन हक्क संघटनेचे सभास्थळी पंगत आंदोलन

नगर – शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर पेन्शन हक्क संघटनेने बहिष्कार घातला आहे. परंतु सभास्थळी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून भोजनाचा आस्वाद घेणार आहे. या भोजनावर सत्ताधाऱ्यांनी 8 लाखाहून अधिक करत आहे. त्यामुळे आपल्या हक्काचे भोजनाचा अस्वाद निवांत बसून घेणार आहे. जेवण दर्जेदार असणार यात शंका नाही. परंतु डिसीपीएसधारकांच्या हक्कांच्या मागण्यांचे काय, असा प्रश्‍न करत यावर तोडगा काढण्यासाठी पेन्शन हक्क संघटना वार्षिक सभेत लक्षवेधी पगंत आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेचे उच्चाधिकारी समितीचे अध्यक्ष केशवराज कोल्हे यांनी दिला आहे.

डिसीपीएसधारकांची शिक्षक बॅंकेकडे मदतनिधीची मागणी केली आहे. ही मदतनिधी आता दोन लाख रुपये मिळते आहे. ती पाच लाख व्हावी, अशी मागणी आहे. या मागणीसाठी डिसीपीएसधारकांच्या शिष्टमंडळांने सत्ताधाऱ्यांशी दोनदा भेट घेऊन चर्चा केली. आश्‍वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. वार्षिक सभा आली, तरी देखील मागणीवर कार्यवाही झाली नाही. डिसीपीएसधारकांच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आता सभा स्थळी पेन्शन हक्क संघटना पगंत आंदोलन करणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या वार्षिक सभेसाठी सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. जेवण देखील दर्जेदार असेल, असे सांगत भोजन व्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर असणार आहे. जेवणाचा दर्जा निष्कृष्ट निघाल्यास त्याचीही जबाबदारी घेण्यास सत्ताधाऱ्यांनी पुढे यावे. हे जेवण सभा सुरू असतानाच पेन्शन हक्क संघटना करणार आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.
सभेला गालबोट लागेल, असे कोणतेही वर्तन पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

या सभेत डिसीपीएसधारकांच्या मागण्यांवर सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने विचार न केल्यास त्याचा जाब घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असाही इशारा संघटनेने दिला आहे. सभा शांततेत व्हावी यासाठी भोजनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ यांच्यासह बाजीराव मोढवे, केशव कोल्हे, मच्छिद्र भापकर, संदिप भालेराव, योगेश थोरात, शैलेश खणकर, भाऊसाहेब पाचरणे, मच्छिंद्र कदम, अमोल सोनवणे, नाना गाढवे, वसंत भातकुडव, शिवाजी आव्हाड, बाबा धरम, सतीश पटार, तौसीफ सय्यद व विनोद देशमुख यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)