यंदाचा पुरूषोत्तम करंडक ‘सारडा’ कडे

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मिरवणूक काढून साजरा केला जल्लोष

नगर – महाविद्यालयीन व नाट्य क्षेत्रात मानाचा व प्रतिष्ठेचा असलेल्या पुरुषोत्तम करंडकावर नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने आपले नाव कोरले आहे. 2 सप्टेंबरला पुण्यात झालेल्या अंतिम फेरीत सारडा महाविद्यालयाने सादर केलेल्या पीसीओफ या नाटकाने बाजी मारली. दिग्दर्शनाचे प्रथम, स्त्री अभिनय प्रथम व उत्तेजनार्थ, असे पारितोषिके पटकावित पुरुषोत्तम करंडक पटकाविला.

शाहू करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतही पेमराज सारडा महाविद्यालयाचे सादर केलेल्या पीसीओफ व लाईफ आफ्टर ग्रीफफ या दोन एकांकिकांना अनुक्रमे सांघिक द्वितीय व तृतीय पारितोषिके मिळाली. या तीन मोठ्या प्रतिष्ठेच्या व मानाचे पारितोषिक प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविल्याबद्दल महाविद्यालयात फटाके फोडून व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद साजरा केला.

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्यध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनिल रामदासी, महाविद्यालयाचे चेअरमन ऍड.अनंत फडणीस, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, प्रा.अविनाश बेडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आदिंनी एकांकिकेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. एकांकिकेचे दिग्दर्शक विनोद गरुड यास नटश्रेष्ठ गणपतराव गोडस पारितोषिक, मोनिका बनकर हिस उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे केशवराव दाते पारितोषिक, अविष्कार ठाकूर यास अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. शाहू करंडक स्पर्धेत पीसीओफ एकांकिने सांघिक द्वितीय, लाईफ आफ्टर ग्रीफफ सांघिक तृतीय, दिग्दर्शन प्रथम- दीपक लोळगे, दिग्दर्शन द्वितीय- विनोद गरुड, स्त्री अभिनय प्रथम- वैभवी तोरडे, स्त्री अभिनय द्वितीय- मोनिका बनकर, वाचिक अभिनय प्रथम- श्रद्धा डोळसे, नेपथ प्रथम- अविनाश राऊत, प्रकाश योजना प्रथम- पृथ्वीराज केदारी, संगीत प्रथम- श्रृता भाटे आदींनी वैयक्तिक पारितोषिके मिळविली.

महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.रत्ना वाघमारे, प्रबंधक अशोक असेरी, उपप्राचार्य ज्ञानदेव जाधव, पर्यवेक्षक प्रा. मंगला भासले, ऍड. मेघना फडणीस, प्रा. कुलकर्णी उपस्थित होते. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)